पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा गोव्यात कार अपघातात मृत्यू झाला आहे.तिचा मित्र शुभम देगडे यांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावरुन जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाडीत जाऊन कोसळली. दरम्यान गाडी लॉक झाल्यामुळे दोघेही गाडीत अडकले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात झाला. गाडीचं स्टिअरिंग फिरल्याने गाडी रस्त्याच्या कडेला गेली आणि खाडीत कोसळली. सकाळी सात वाजता अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्या दोघांचे मृतदेह गाडीमधून बाहेर काढले. (Snehal VO)<br /><br />#MarathiActressEngagement #MarathiActress #LokmatFilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber